सांगली: राज्यासह देशात यंदा हळद लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे कंदकुजीचा धोका आहे. रोपांची वाढ जोमात आहे. बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. ही तेजी टिकून राहील. .साधारण प्रतिक्विंटलला १२ हजारांवर दर स्थिर राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पावसाचा नेमका किती फटका उत्पादनाला बसेल, याची आकडेवारी दोन महिन्यांत पुढे येईल, असेही त्यांनी सांगितले..Sangli News: अजित पवार आणि शरद पवार गट आमने-सामने; आष्ट्यातील रणधुमाळीत भाजपचा उमेदवार ठरविणं कठीण!.देशात गत वर्षी हळदीला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात मे, जूनपासून सुरू असलेला पाऊस सतत सुरूच आहे. त्या पावसाचा हळद लागवडीवर परिणाम झाला नाही. मात्र उत्पादनावर परिणाम शक्य आहे. या परिस्थितीतही जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळदीची लागवड झाली आहे. .आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू राज्यांत पोषक वातावरण होते. त्याबरोबर पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे या राज्यात दीडपट क्षेत्र वाढले आहे. एकूण ही वाढ ३० टक्क्यांनी आहे. मराठवाडा, विदर्भातील हळदीला सुमारे १४ हजार ते १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सांगली परिसरातील राजापुरी हळदीस सध्या प्रतिक्विंटल १८ हजार ते १८ हजार ५०० रुपये दर आहे. .Sangli News: जयंत पाटलांच्या पुढाकाराने इस्लामपूरात ‘पंचनामा’ मोहिमेचा झंझावात; मतदारांचे लक्ष वेधणारा राजकीय खेळ!.हे दर यावेळी टिकून राहतील. पश्चिम महाराष्ट्रात नदीकाठच्या भागातील हळदीला अतिपावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. हळद पिकांची मुळी सुरू ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र, कृषी विभागाकडून अशी मोहीम नाही. .मराठवाड्यातही वसमत, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत सरासरी ४० टक्के लागवड जास्त आहे. परंतु, मराठवाड्यात सरासरी १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले जाते. जुना साठाही फारसा नाही. दरात तेजी आहे. सध्या बाजारात आवक कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे..सध्या हळदीचे दर तेजीत आहेत. मात्र, बाजारात आवक वाढल्यानंतर तेजी कशी असेल हे नेमके सांगता येणार नाही. शेतकऱ्यांनी पावसामुळे हळद पिकाची मुळी सक्रिय ठेवली, कंदकुज होऊ दिले नाही, तर उत्पादनात चांगली वाढ शक्य आहे, तरीही तेजी-मंदीत किमान प्रतिक्विंटल १२ हजार रुपये वर्षभर राहील. त्यापेक्षा खाली येणार नाही.- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.