
कोल्हापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोडी, चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्यासह त्याच्या दाजीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. उत्तम राजाराम बारड (वय ३१, रा. धामोड, राधानगरी) व अजिंक्य सयाजी केसरकर (वय ३२, रा. मत्तीवाडे, ता. चिक्कोडी, बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांकडून १० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून, १५ तोळे दागिने, चांदीचे अलंकार, दुचाकी असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.