काळाचा दोन चिमुरड्यांवर घाला, खेळताना पाय घसरला, विहिरीत बुडून मृत्यू झाला

two child drown in well in belgaum both are dead
two child drown in well in belgaum both are dead
Updated on

बेकिनकेरे (बेळगाव) : खेळता-खेळता विहिरीत पडल्याने दोन बालकांचा बडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बेकिनकेरेत (ता. बेळगाव) ही घटना घडली. लोकेश विठ्ठल पाटील (वय १०, रा. बेकिनकेरे) आणि निखिल रामू बोंद्रे (८, रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कोरोनामुळे शाळांना सुटी असल्याने ढेकोळीचा निखिल काही दिवसांपूर्वी बेकिनकेरेत आजोळी आला होता. सकाळी अकराच्या सुमारास निखिल, लोकेश आणि श्री धायगोंडे हे तिघे मित्र खेळण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. खेळता खेळता ते घरापासून दूरवर असलेल्या तलावानजीक गेले. त्यावेळी निखिल आणि लोकेश पाय घसरुन किंवा तोल जाऊन बाळू मल्लाप्पा गावडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडले. त्यांचा पाण्यात बडून मृत्यू झाला.

दोन्ही मित्र विहिरीत पडताच त्यांच्या सोबत असलेल्या श्रीने भीतीने घराकडे पळ काढला. त्याने घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील एका मुलाला बाहेर काढले. पण, त्याचा मृत्यू झाला होता.
विहिरीत आणखी एकजण बुडाल्याचे श्रीने सांगितल्यानंतर ग्रामस्थही घाबरले. काहींनी घटनेची माहिती काकती पोलिसांना दिली. लागलीच पोलिस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने दुसरा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लोकेश चौथीत तर निखिल दुसरीत शिकत होता. लोकेश एकुलता होता. घटनास्थळी मृत बालकांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. घटनेची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.

अंदाज न आल्याने बुडाले?

बाळू गावडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीभोवती झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच, विहिरीच्या कडेने संरक्षक कठडाही बांधलेला नाही. जमिनीच्या बरोबरीने असलेल्या विहिरीचा सहजासहजी अंदाज येत नाही. खेळता-खेळता पुढे जात असताना पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com