कडेपूरात वीजेच्या धक्क्याने दोन कोल्ह्यांचा जागीच मृत्यू

वीजेच्या धक्क्याने दोन कोल्ह्यांचा झालेल्या मृत्यूची वन विभागाने घेतली गंभीर दखल
दोन कोल्ह्यांचा मृत्यू
दोन कोल्ह्यांचा मृत्यूsakal
Updated on

कडेगाव (सांगली): कडेपूर (ता.कडेगाव) येथे विद्युत वाहक तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता सुभाष शामराव यादव यांच्या शेतात उघडकीस आली.याबाबत कडेगाव वनविभागात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,कडेपूर येथे सुभाष यादव यांच्या शेतजमीन परिसरात ओव्हरलोडमुळे विद्युत वाहक तार तुटून जमिनीवर पडली होती.तरीही सदर तारातून विद्युत पुरवठा सुरु होता.या जमिनीवर पडलेल्या तारांना येथे दोन कोल्ह्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन कोल्ह्यांचा मृत्यू
निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार, निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका

याबाबत माहिती मिळताच सहायक वन संरक्षक डॉ.अजित साजने,वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण यांचेसह कडेगाव-पलूस वन परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी महावितरणचे सहायक अभियंता अजय काशीद यांनी घटनास्थळी भेट देवून तारांना स्पर्श झाल्याने वीजेच्या धक्क्याने कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

तर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.मुसळे यांनी मृत कोल्ह्यांचे शवविच्छेदन केले व पंचासमक्ष त्यांचे दहन करण्यात आले. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील तरतुदी नुसार वन्यप्राणी कोल्ह्याचा समावेश अनुसूची दोन मध्ये आहे.प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू दिसत असला तरी वनविभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दोन कोल्ह्यांचा मृत्यू
'अशा' पद्धतीने सुरु होत आहेत राज्यातील शाळा: वर्षा गायकवाड

या प्रकरणाची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून उपवनसंरक्षक विजय माने,सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण,वनपाल एस.व्ही.साळोखे, भाग्यश्री कुंभार हे करीत आहेत.

कोणताही वन्य प्राणी घरामध्ये,शेतामध्ये, अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभागास 1926 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले.

"वीजेच्या धक्क्याने दोन कोल्ह्यांचा झालेल्या मृत्यूची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू दिसत असला तरी वनविभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे."

- डॉ.अजित साजणे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सांगली

महावितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप

गेल्या काही दिवसांपूर्वी कडेगाव येथे तुटलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता.तर आज कडेपूर येथे दोन कोल्ह्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटूल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com