
Police seize gutkha worth ₹26 lakh in Rui, two smugglers caught near Aurwad.
Sakal
कुरुंदवाड : गुटख्याची तस्करी वाहतूक करणाऱ्या रुई (ता. हातकणंगले) येथील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडले. औरवाड (ता. शिरोळ) गणेशवाडी मार्गांवर ही कारवाई झाली. दोघांकडून तब्बल २६ लाख ६४ हजारांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ३२ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन बबन कौलगे व महेश शिवाजी कोरवी (दोघे रा. रुई, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या चोरट्याची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.