दोनशे अठ्ठेचाळीस जवान सैन्यात दाखल 

दत्ता इंगळे 
रविवार, 19 जानेवारी 2020

जनरल सुंदरजी सुवर्णपदकाचे मानकरी 
या परेडमध्ये जनरल सुंदरजी सुवर्णपदकाचे मानकरी, रिक्रूट शिवम सिंह, जनरल के. एल. डिसूझा कांस्यपदकाचे मानकरी, रिक्रूट राम दयाल व जनरल पंकज जोशी रौप्यपदकाचे मानकरी ठरले

नगर तालुका: एमआयआरसीतील सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस जवानांनी लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा (विएसएम, चीफ ऑफ स्टाप, दक्षिण कमांड) यांच्या उपस्थितीत येथील आखौरा ड्रील मैदानावर देशसेवेची शपथ घेतली. 

36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण 
नगरच्या मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) येथील जवानांनी 36 आठवड्यांच्या खडतर सैनिकी प्रशिक्षणानंतर शनिवारी (ता. 18) पासआऊट परेडमध्ये शानदार संचलन करत देशसेवेची शपथ घेतली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे नातेवाईक, सैनिकी प्रशिक्षण देणारे संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह मिल्ट्री जवान उपस्थित होते. 

जनरल सुंदरजी सुवर्णपदकाचे मानकरी 
या परेडमध्ये जनरल सुंदरजी सुवर्णपदकाचे मानकरी, रिक्रूट शिवम सिंह, जनरल के. एल. डिसूझा कांस्यपदकाचे मानकरी, रिक्रूट राम दयाल व जनरल पंकज जोशी रौप्यपदकाचे मानकरी ठरले. रिक्रूट दिनेश चंद यांचा पदक बहाल करून लेफ्टनंट जनरल आहुजा यांच्या हस्ते सन्मान झाला. तसेच (स्व.) सुभेदार मेजर भवानी दत्त जोशी यांच्या पत्नी सुशीला देवी यांना वीरनारी सन्मानाने गौरविण्यात आले. परेड संपल्यावर जवानांनी शहीद स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या माता-पित्यांचा गौरव पदक देऊन करण्यात आला. 

आवश्‍य वाचा - शिर्डीकर बंदवर ठाम, पाथरीसह आठ ठिकाणचे दावे फेटाळले 

रणगाडा संग्रहालय 
नगर हे लष्कराचे मुख्य केंद्र आहे. येथील रणगाडा संग्रहालय लष्कराच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. या संग्रहालयात देशोविदेशातील रणगाडे आहेत. हे रणगाडे आपल्या भारतीय सैनिकांनी युद्धात जिंकून घेतले आहेत. रणगाड्यांचा शोध लागण्यापूर्वी जगप्रसिद्धी रोल्स राईस कंपनीची चिलखती वाहनेही येथे पाहायला मिळतात. नाझीचा रणगाडा, जर्मनीच्या हिटलरचे रणगाडेही या संग्रहालयाची शान वाढवतात. अर्जुन रणगाडाही या संग्रहालयात आहे. 

परमवीर चक्र, वीरचक्रप्राप्त सैनिकांचेही स्मारक या संग्रहालयाजवळ आहे. नगर शहराच्या तीनही बाजूंनी लष्करी ठाणे आहे. के.के. रेंजवर हे लष्कर युद्धसराव करते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred and forty-eight soldiers entered the army