नगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

पारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर पुणे महामार्गावर भारत पेट्रोल पंप नजीक  दुचाकी (क्र. MH-16-A-3619 ) आणि 
मारुती कार ( क्र. MH-23-Y-1552 ) यांची जोरदार धडक झाली. यात दुचाकी वरील माणिक नामदेव पठारे (वय 50 वर्ष रा.म्हसणे ) आणि  रामा पार्वती आराखडे (वय 58 वर्ष रा.बाबूरडी ता.पारनेर ) हे जागीच ठार झाले.  

दरम्यान, कार चालकाविरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident on nagar Pune highway