गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

राजेंद्र उएफ पप्पू भीमा चव्हाण (वय 22, रा. खटकाळी बेलापूर ) व  सुलतान इटकर  मुक्तर शेख (वय 24, रा. रामगड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

श्रीरामपूर : गावठी कट्टा विक्री प्रकरणी पोलिसांनी रामगड (ता.श्रीरामपूर) येथील दोघांना कट्ट्यासह अटक केली. नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने आज सायंकाळी ही कारवाई केली. 

राजेंद्र उएफ पप्पू भीमा चव्हाण (वय 22, रा. खटकाळी बेलापूर ) व  सुलतान इटकर  मुक्तर शेख (वय 24, रा. रामगड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

या बाबतची माहिती अशी की, बेलापूर हद्दीतील रामगड येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांध्यास पोलीस शिपाई रवींद्र कर्डीले, मनोज गोसावी,  दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, मच्छीन्द्र बर्डे यांनी तेथे सापळा लावला. त्यावेळी कट्टा घेऊन  आलेल्या पप्पू चव्हाण व सुलतान शेख  यांना अटक करण्यात आली. 

राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण याचेवर कालिकानगर (नाशिक) येथे एक तर श्रीरामपुर येथे  तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एक कट्टा व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two men arrested for selling pistols