

Nursing Students Drowned
esakal
Sangli District News : जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असताना दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. प्रशांत पाटील (वय २५, रा. जळगाव) आणि गंगाधर रमेश सुकुरवार (वय २४, रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होते.