esakal | शिराळा वनविभागातील वनपालासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

शिराळा वनविभागातील वनपालासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

शिराळा वनविभागातील वनपालासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सांगली : लाकडू वखारीतील वाहतूकीवर कारवाई टाळण्यासाठी दीड हजारांची लाच घेताना शिराळा (shirala forest office sangli) वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपालासह (two officers arrested under bribery) दोघांना रंगेहात पकडण्यात आले. वनपाल अमोल दत्तात्रय शिंदे (वय ४१) असे त्याचे नाव आहे. खासगी इसम लाकूड वखार चालक पांडूरंग रामचंद्र खुडे (३७, रा. खंडेश्‍वर मंदिराजवळ, पेठ, ता. वाळवा) याच्यावरही कारवाई झाली. सांगली लाचलुचपत विभागाची आठवड्यात दुसरी कारवाई झाली आहे. (two officers from forest department shirala arrested police for bribery)

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी दहा दिवसांपुर्वी भाटशिरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील निलगीरीची झाडे तोडली होती. विक्रीसाठी पेठ नाका येथील यशवंत बॅकवर्ड क्लास सुतार औद्योगिक सहकारी संस्थेत आले. ही वखार संशयित पांडुरंग खुडे याची आहे. दोन ट्रॅक्‍टर ट्रॉल्या डंपीग केल्या होत्या. सदर डंपींग केलेल्या दोन ट्रॉल्यांवर कारवाई न करण्यासाठी वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपाल अमोल शिंदे यास दोन हजार व वनक्षेत्रपाल सुशांत काळे यास पाच असे दोन्ही मिळून सात हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच प्रत्येक लाकडाच्या ट्रॉलीसाठी पाचशे रूपये महिना हफ्ता देण्याचीही मागणी करण्यात आली.

हेही वाचा: पैशापेक्षा माणसं, फॅमिली जपूया! 24 तासांत आम्ही आई-वडिल गमावलेत

खासगी इसम बापु याने वनपाल शिंदे यास पैशे द्या नाहीतर लाकूड वखारीत आणू नका, असेही तक्रादार यांना सांगितले. अखेर तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी वनपाल अमोल शिंदे व वखार चालक पांडुरंग खुडे या दोघांनी चर्चेअंती दीड हजार रूपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पेठ येथील यशवंत वखारीजवळ सापळा रचला.

वनपाल शिंदे आणि वखारचालक पांडुरंग खुडे यांनी दीड हजारांची लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियामानुसार कारवाई करण्यात आली. लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अंमलदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, सोहेल मुल्ला, राधीका माने यांचा कारवाईत सहभाग होता.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका