
बेळगाव : वॉशिंग मशिन दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करीत घरमालकांना बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या दोन लुटारूंना आज अटक करण्यात आली. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, संशयितांकडून सुमारे तीन लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मारुती परशराम जाधव (वय २८, रा. विशाल गल्ली, कंग्राळी खुर्द) आणि शुभम राजू बळसिद (२५, रा. वैभवनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, की
३० नोव्हेंबरला शोभा गुरुराव काथवटे (रा. शिवाजी कॉलनी, टिळकवाडी) यांच्या घरी दोन तरुण वॉशिंग मशिन
दुरुस्तीच्या बहाण्याने आले होते. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शोभा यांचे तोंड दाबून मारहाण करत त्यांना बेशुध्द केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी, सोन्याच्या बांगड्या लुटल्यानंतर शोभा यांचे पती गुरुराव यांनाही मारहाण करत बेशुध्द केले. त्यांच्याही गळ्यातील सोनसाखळी, अंगठ्या आणि २५ हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करुन पलायन केले होते.
याप्रकरणी टिळकवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक विनायक बडीगेर व सहकाऱ्यांनी शुक्रवारी वरील दोघा संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने आणि सात हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.