गायींच्या कळपाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी : माधवनगरमधील प्रकार 

MADHAVNAGAR ROAD.jpg
MADHAVNAGAR ROAD.jpg

सांगली- माधवनगर (ता. मिरज,जि. सांगली) येथे बंद पडलेल्या माधवनगर कॉटन मिलच्या गेटसमोर पाचशेवर राजस्थानी गीर गायींच्या कळपाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जखमी झाला. आज दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रसंगावधान राखून दुचाकीस्वार धडपडून गायींच्या कळपातून बाहेर पडला, अन्यथा त्याचा चेंदामेंदा ठरलेला होता. 


माधवनगर-बुधगावर रस्त्यावर दुपारी तीनच्या सुमारास गायींचा कळप पश्‍चिमेकडून आला, तर दुचाकीस्वार बुधगावकडून माधवनगरला येत होता. त्याचवेळी हा अपघात घडला. "लॉकडाऊन' मुळे रस्ता रिकामा होता. दुचाकीस्वार जात असतानाच अचानक कळप रस्त्यावर आल्यामुळे त्याला गायींची धडक बसली. त्यामुळे तो खाली पडला. कसाबसा उठून तो कळपातून बाहेर आला. त्यामुळे थोडक्‍यात बचावला. 
"कोरोना' मुळे संचारबंदी असून अत्यावश्‍यक कामाशिवाय रस्त्यांवर फिरण्यास मनाई आहे. मोकळ्या रस्त्यांवर पाळीवसह मोकाट प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्री तर मोकाट व भुकेल्या कुत्र्यांचा त्रास खूपच वाढला आहे. मास्क वा रुमाल बांधलेल्या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्र्यांच्या झुंडी धावतात. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रकार वाढलेत. काही दिवसांपूर्वी सांगलीत भरवस्तीत अशाच भुकेल्या व मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका चिमुकल्याला जखमी केले होते. शहराबाहेर उपनगरातही असे प्रकार घडत आहेत. लॉकडाऊनमुळे शाकाहारी-मांसाहारी खाद्यपदार्थांच्या गाड्या आता दिसत नाहीत. त्या गाड्यांवर निर्माण होणारा कचरा, शिल्लक पदार्थ आता मिळत नसल्याने ही कुत्री पिसाळली आहेत. त्यांच्या खाद्याची व्यवस्था होत नसल्याने ते माणसांवर हल्ले करत आहेत. अशाच परिस्थितीत माधवनगर कॉंटनमिलसमोर आजची ही घटना घडली. दुपारची वेळ आणि कुत्री नव्हती. पण गायींचा कळप दुचाकीस्वाराला नडलाच. 

अनियंत्रित कळप... 
गिरगायींचे पालन करणाऱ्या राजस्थानमधून आलेल्या पशुपालकांनी बंद कॉटन मिलच्या आवारात आपला तळ ठोकला आहे. दिवसभर या गाई परिसरात चरवतात. गायींच्या दुधाची विक्री ते परिसरात करतात. मात्र गायींचा कळप एवढा मोठा असतो, की काहीवेळा गायींमुळेच रस्त्यांवरची वाहतुक थांबते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com