अखेर भाजप पक्षप्रवेशावर उदयनराजेंनी अंतिम निर्णय घेतला

Udayanraje-Bhonsle
Udayanraje-Bhonsle

सातारा : नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षातील प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून आज स्पष्ट झाले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून ते राष्ट्रवादीतच सक्रिय होतील, अशी शक्‍यताही त्यांनी वर्तवली.

फासे पलटले; उदयनराजेंच्या भाजपप्रवेशासाठी चार अटी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. गेला महिनाभर कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीतून आऊटगोईंग जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निकालानंतर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्या. मात्र, या सगळ्या नाट्यावर त्यांनी पडदा टाकला असल्याचे समजत आहे.

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाचा संभ्रम कायम

प्रवेशनाट्यावर पडदा...
विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक व्हावी व योग्य सन्मानात प्रवेश व्हावा, अशी खासदार उदयनराजे व समर्थकांची अपेक्षा होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाकडून त्यांना याबाबत ठोस आश्‍वासन मिळाले नाही. बरेच दिवस त्यांना या निर्णयासाठी थांबावे लागले. पक्षांतर्गत अडथळे निर्माण केले जात असल्याचे समजल्यावर स्वत: उदयनराजेंनीही नाराजी व्यक्‍त करत, मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले होते. अखेर तीन आठवड्यांपासून रंगलेल्या या सर्व प्रवेशनाट्यावर स्वत: उदयनराजेंनी स्थगितीचा पडदा टाकल्याचे आज स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com