esakal | Vidhan Sabha 2019 : मराठा आरक्षणावरून उदयनराजेंची पवारांवर टीका, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

udayanraje Criticism on sharad pawar in satara rally

मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या स्वयंघोषीत नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला असे शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे भोसले यांनी टीका केली. 

Vidhan Sabha 2019 : मराठा आरक्षणावरून उदयनराजेंची पवारांवर टीका, म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या स्वयंघोषीत नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला असे शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे भोसले यांनी टीका केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैनिक स्कूल मैदानावर सभा आयोजिली आहे. व्यासपीठावर खासदार रामदास आठवले, लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले, विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदन भोसले, जयकुमार गोरे, धैर्यशिल कदम, डॉ. अतुल भोसले, शंभूराज देसाई, महेश शिंदे, दिंगबर आगवणे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदींची उपस्थिती होती. 

प्रारंभ उदयनराजे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, या भुमीचे आणि मोदीजींचे पंतप्रधान होण्यापुर्वीचे नाते आहे. लक्ष्मणराव इनामदार हे आपल्या सातारा भुमीतील होते. एकदंरीत परिवर्तन घडत आहे. त्याचे कारण एकच आहे. मोदीजींचा विचार, दूरदृष्टीने आणि भारताबद्दलचे व्हिजन. स्वराज्याचा विचार सर्वधर्म समभावाचा विचार त्यांनी दिला. त्याच विचाराच्या आधारावर अनेकांनी भाष्य केले. परंतु त्यास तिलांजली दिली. 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने सत्तेचे केवळ केंद्रीकरण केले. यामुळे मूठभर लोकांच्या हातात सत्ता आली आणि त्याचा वापर फक्त राजकरणासाठी केला गेला.

मोदी हे "आर्यनमॅन' ची भुमिका निभावत आहेत. पोलादी पुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचाराने देश अखंड ठेवण्याचे काम ते करीत आहेत. तोच विचार घेऊन मोंदीजींना 370 कलम रद्द केले. परंतु काहीजण 370 कलम आणि महाराष्ट्राचा काय संबंध असे विचारत आहेत. केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशातील प्रत्येक राज्याशी निगडीत आहे, असेही उदयनराजे म्हणाले. 

सीमेवर असलेले जवान आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. हे कदापी विसरता कामा नये. कॉंग्रेसने याबाबत निर्णय घेतलना नसता तर किती लोक शहीद झाले नसते याचा विचार करा. अहो..अनेकांचे संसार वाचले असते. 

शरद पवारांवर टीका....
समाजाबद्दल आरक्षणाबद्दल वक्तव्य केले जात होते. परंतु मराठा समाजाच्या स्वयंघोषित नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला. 

मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीत 
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तुळजा भवानीस नमन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना दंडवत करीत साताऱ्याच्या भूमीत आलो अशी मराठीतून सुरुवात केली.

loading image