शिवसेनेच्या दादा लोकांना हक्काची ताई मिळाली - उद्धव ठाकरे

सागर कुंभार
शनिवार, 15 डिसेंबर 2018

रुकडी - पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दादा लोकांना हक्काची ताई मिळाली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातून सुरु झालेली वारी संपूर्ण महाराष्ट्र भर पसरेल व महाराष्ट्रात सगळीकडे भगवा फडकेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई येथील शिवसेना भवन येथे राष्ट्रवादीच्या माजी खासदार व अखिल भारतिय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्रीमती निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात श्री ठाकरे बोलत होते. यावेळी शिवबंध बांधून घेत अखेर निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मंत्री दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार उल्हास पाटील, शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर,  धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.  

दरम्यान, राष्ट्रवादीकडून माने गटावर झालेल्या अन्याय व गटाला नेहमी ग्रहीत न धरण्याचे धोरण तसेच खासदार राजू शेट्टी यांना आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने पाठींबा जाहीर केल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी ही शिवसेनेत कार्यकर्त्यासह प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी तालुका हातकणंगलेचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख, युवक तालुका अध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शितल खोत, झाकीरहुसन भालदार, आदिक पटेल, रविंद्र ताडे, सागर पाटील, चंद्रकांत मोरे यांच्यासह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. 

Web Title: Udhav Thakre comment