पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्योतिषाचा धंदा करावा : उदयनराजे

Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale
Updated on

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांना 24 ऑक्‍टोबरनंतर कोणताही उद्योग राहणार नसल्याने, त्यांनी आता भाकिते सांगत फिरण्याऐवजी एखाद्या मोठ्या झाडाखाली बसून कुडमुड्या ज्योतिषाचा धंदाच सुरू करावा. तेवढेच काम त्यांना राहणार आहे, अशा शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्‍तव्याची खिल्लीही उडवली. 

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे हे दोन लाखांच्या मतांनी पराभूत होतील, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी पत्रकाद्वारे चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालता घालता, त्यांच्यातीलच एक होऊ पाहणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचा दोन लाखांनी पराभव होण्याचे भाकित केले. त्यांच्याच मतदारसंघातील बहुतांशी व्यक्‍तींनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या दोस्ताला दोन- चार लाथा घालून मतदारसंघातून हाकलून देण्याचा निर्धार आमच्याकडे व्यक्‍त केला आहे. त्यांनी त्याची चिंता करावी, आमची चिंता नको, असा घणाघात उदयनराजेंनी केला.

ते म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण यांनीच राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यांबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे संचालक असलेल्या राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाऱ्यांना चाप बसावा, पुन्हा सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण होऊ नये, यासह भ्रष्टाचार उघड व्हावा म्हणून चौकशी लावणारे पृथ्वीराज चव्हाण हे आज राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करत आहेत. त्यांची ही दुटप्पी भूमिका मतदारसंघातील कोणालाही पटणारी नाही. त्यामुळेच त्यांच्याच मतदारसंघातील काही व्यक्‍तींनी त्यांच्याविषयी आमच्याजवळ तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली आहे. आमचा दोन लाखांनी पराभव होईल, असे भाकित करणाऱ्या चव्हाण यांनाच आता मतदार दोन- दोन लाथा घालून मतदारसंघातून हाकलून लावतील. अतुल भोसले या उमद्या उमेदवारासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करणार असल्याचा निर्धार बहुतांशी मतदारांनी बोलून दाखवला आहे.'' 

भाजपचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुय्यम फलंदाज आहेत, या वक्‍तव्यावर पलटवार करताना उदयनराजे म्हणाले, "भाजपमध्ये सलामीवीर, दुय्यम अशी फलंदाजांची मोठी फळी तरी आहे. चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षात "नाईट वॉचमन' म्हणून सुद्धा फलंदाजी करण्यासाठी कोणी राहिलेला नाही. तेज किंवा फिरकी गोलंदाज तर त्यांना अजूनही सापडलेलाच नाही. नुसत्या फेकी गोलंदाजावर चालवून घेतले जात आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कीव तर वाटतेच; पण किळसही वाटतो. स्वतः चव्हाण यांच्या दुटप्पी आणि स्वार्थी कार्यशैलीमुळेच कित्येक जणांनी काँग्रेस आघाडीच्या बुडत्या जहाजातून केव्हाच उडी मारली आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com