Video : ...तर मी फॉर्मही भरणार नाही : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही, अर्जही करणार नाही. फक्त पवार साहेबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी. 

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उभे राहिले तर मी फॉर्मही भरणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार हे आज (मंगळवार) स्पष्ट झाले असून, निवडणूक आयोगाकडून याबाबतची आज अधिसूचना काढण्यात आली. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरला साताऱ्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळाला आहे. नुकतेच शरद पवार यांनी सातारा दौऱ्यात राजे हे वागणे बर नव्हं अशी टीका केली होती. त्यावर उदयनराजेंना आज प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आले. उदयनराजे म्हणाले, शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही, अर्जही करणार नाही. फक्त पवार साहेबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale challenges Sharad Pawar to contest satara Loksabha bypoll