मला टार्गेट केलं म्हणत उदयनराजेंनी टेबलवर मारल्या बुक्क्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

साताऱ्याची विधानसभा लढणार का या प्रश्नावर उदयनराजे यांनी दिखुलास हसत आता एवढंच राहील होत, असे सांगून तिथं शिवेंद्रसिंहराजे हे डॉन आहेत. त्यांच्या विरोधात धाडस करेन का? असा प्रश्न उपस्थित केला.

सातारा : भाजप प्रवेश झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांचे शनिवारी रात्री साताऱ्यात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलत असताना उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षात झालेली घुसमट बोलून दाखवली. या वेळी बोलत असताना ते म्हणाले, माझ्या मनाला जे वाटलं बुद्धीला जे पटलं ते मी केलं. मला टार्गेट केलं गेलं होतं.15 वर्षे मी सहन केलं हे सांगताना उदयनराजेंनी टेबलवर चक्क बुक्क्या मारल्या. 

विकासाची काम मोठ्या प्रमाणात व्हावी ही माझी मनापासुन इच्छा असल्याचे यावेळी उदयनराजेंनी स्पष्ट केले. या अगोदर ती झाली असतील तर आज ही वेळ आली नसती अशी भावना देखील त्यांनी बोलत असताना व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेबाबत बोलत असताना उदयनराजे यांनी आव्हाडांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. मी जितेंद्र आव्हाडांना मानापासून थॅंक्यु म्हणतो, ते मला अजून तरुण समजतात.

राष्ट्रवादी पक्षाला बसणाऱ्या धक्क्यांबाबत बोलत असताना उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षात मी भरपूर काम करायचा प्रयत्न केला. मी जिवंत राहिलो हेच माझे नशीब. राज्यसभेवर जाणार की लोकसभेची पोट निवडणूक लढणार या प्रश्नाचे उत्तर त्यांनी मिश्किलपणे दिले. ते म्हणाले, आत्ताच तर मला जितेंद्र आव्हाडांनी तरुण केलंय राज्यसभेवर पाठवून तुम्ही म्हातार करताय का?

साताऱ्याची विधानसभा लढणार का या प्रश्नावर उदयनराजे यांनी दिखुलास हसत आता एवढंच राहील होत, असे सांगून तिथं शिवेंद्रसिंहराजे हे डॉन आहेत. त्यांच्या विरोधात धाडस करेन का? असा प्रश्न उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale statement after enters BJP in Satara