राजकारण हा माझा पिंड नाही : उदयनराजे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

निवडणुका केंद्रातील असो की राज्यातील त्या अटळ असतात. त्या निवडणुकीला सामोरे जात असताना द्विधामनस्थिती आता दूर झाली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मी अर्ज भरत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करेन. मला कोणत्या पदाची अपेक्षा नव्हती.

सातारा : नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी मी प्रय़त्न करत आहे. राजकारण हा माझा पिंड नाही. नागरिकांचे मुद्दे घेऊन मी आतापर्यंत राजकारण केले आहे, असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले आज (मंगळवार) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

उदयनराजे म्हणाले, की निवडणुका केंद्रातील असो की राज्यातील त्या अटळ असतात. त्या निवडणुकीला सामोरे जात असताना द्विधामनस्थिती आता दूर झाली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मी अर्ज भरत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करेन. मला कोणत्या पदाची अपेक्षा नव्हती. पण, माझ्या मतदारसंघात अनेक वर्षांपासून जे प्रश्न होते ते सोडवायचे होते. कृष्णा खोऱ्यातील नागरिकांची कामे मार्गी लागलेली नाहीत. राजकारण हा माझा पिंडच नाही. मुद्दे घेऊन मी राजकारण केले आहे. लोकांच्या कामांना प्राधान्य देणे हेच मी करतो. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबचे प्रश्न भाजप सरकारने मार्गी लावले आहेत. मनावर दडपण होते, ते आता नाही. गेल्या 13 वर्षांत अनेक कामे रखडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale submit form for Satara Loksabha bypoll