Ujjani Dam : उजनीच्या पाण्यासाठी कुर्डुत जलाभिषेक; २३ नोव्हेंबरला कुर्डुवाडी - टेभुर्णी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

उजनी जलाशयातुन बेंद ओढ्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कुर्डू (ता. माढा) येथिल नागनाथ मंदिरात उजनीच्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला.
ujani dam water warning to protest Kurduvadi - Tembhurni road on November 23
ujani dam water warning to protest Kurduvadi - Tembhurni road on November 23Sakal

कुर्डू : उजनी जलाशयातुन बेंद ओढ्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कुर्डू (ता. माढा) येथिल नागनाथ मंदिरात उजनीच्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला. यावेळी कुर्डू, अंबाड, पिंपळखुंटे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उजनी जलाशयातुन रुंदीकरण करण्यात आलेल्या बेंद ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्या‌ंची आहे. त्यासाठी अनेक दिवसापासून आंदोलनाच्या माध्यामातून हि मागणी आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुर्डू येथील नागनाथ महाराज यांच्या पिंडीवर उजनीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला.

यावेळी माजी जि.प. सदस्य प्रतिनिधी अण्णा ढाणे म्हणाले, उपासा सिंचन याजनेच्या माध्यमातून कुर्डू गावच्या एक भाग सिंचनाखाली आला आहे.मात्र गावातील ७०. टक्के भाग पाण्यापासून वंचित आहे. पाण्यावाचून शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. त्यामुळे गटतट पक्ष विसरून पाण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी पाण्यासाठी एकजुटीने लढा उभारु . याचा पहिला टप्पा २३ नोव्हेंबर रोजी कुर्डुवाडी - टेभुर्णी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

संदीप पाटील म्हणाले, सर्वांनी पाण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आहे.आपण तीनही गावांनी एकजुटीने पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागणार आहे. एकत्र असलो तर शासनाला पाणी देणे भाग पडणार आहे. यावेळी पिंपळखुंटेचे विजयसिंह पाटील, विजय भगत, सरपंच प्रतिनिधी बाबासाहेब जगताप,

भारत कापरे, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बालाजी जगताप, कल्याण चोपडे, वसंत जगताप, शिवसेना शाखाप्रमुख तानाजी हांडे, अविराज माळी, चोपडे मेजर यासह तीनही गावातील नागरिक संख्येने उपस्थित होते. सुहास टोणपे यांनी पाण्याच्या संघर्षात मागे न हटण्याची नसल्याची शपथ यावेळी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदवी शिक्षण समुहाचे प्रमुख संतोष कापरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com