उजनीच्या बॅक वॉटरचे पाणी मंगळवेढ्यास मिळणार ? 

हुकुम मुलाणी
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण  झाल्या आहेत. दरम्यान हे पाणी सोलापूर जिल्ह्याला देवू नये यासाठी इंदापूर तालुक्यात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

उजनी जलाशयाची निर्मिती होताना त्या प्रकल्पासाठी जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या. पण दुष्काळी मंगळवेढ्याच्या वाटेला आवश्यक असणारे पाणी मात्र मिळत नाही. कालव्याची अर्धवट कामे यामुळे पाणी कमी मिळत आहे.

यासाठी दुष्काळी 35 गावाला पाणी मिळावे या भागातील जनतेनी बहिष्कार आंदोलन केले. उजनी जलाशयाची साठवण क्षमता 117.23 टीएमसी इतकी असून, यातील उपयुक्त पाणीसाठा 53. 66 इतका असून मृत पाणी साठा 63.66 टी.एम.सी इतका आहे. सध्या धरणातील पाणी 9.6 टी.एमसी खासगी क्षेत्रासाठी राखीव आहे. विद्युत पंपाद्वारे सुमारे 34 हजार हेक्‍टरपेक्षा जास् क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्ताविक लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, यातील ०.३३ टीएमसी पाणी कमी करुन, शेतकऱ्यांच्या हक्काचे शेतीचे बॅक वॉटरचे राखीव १.९७ टीएमसी पाणी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी १.०१ टीएमसी व सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी ४.५० ऐवजी ४.७५ टीएमसी पाणी व सोलापूरच्या औद्योगिक वापरासाठी २.१५ टीएमसीऐवजी ३.२६ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. शासनाकडे तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीसाठी ३ ऑगस्ट २०१८ च्या पत्राद्वारे पाठविण्यात आला. प्रशासनाने इंदापूरला राखीव ठेवलेले पाणी अन्य जिल्हाला देण्याचा डाव आखला आहे या विरोधात आंदोलन करू असा इशारा पुणे जि. प. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिला.

उजनी वर तात्पुरत्या परवानगी असलेले व बंद योजनाचे पाणी कमी करण्याचा प्रस्ताव आहे हे पाणी प्रवाही क्षेत्रासाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवलेला आहे. जीवन शिंदे अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ सोलापूर.
 
Web Title: Ujani's backwater water will get mangalwedha?