MPSC Success Story: मेंढपाळाची लेक बनली अधिकारी; मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टांचे उज्वला टिंगरेने केले चीज, जिद्दीच्या संघर्षाची कहाणी

Shepherds Daughter Ujwala Tingre Achieves Class One Officer Rank: मेंढपाळ वडील आणि मजुरी करणारी आई यांच्या कष्टांचे उज्वला टिंगरे हिने चीज केले.
Ujwala Tingre MPSC Achievement Inspires Rural Students as Daughter of Labourer Mother and Shepherd Father Becomes Officer

Ujwala Tingre MPSC Achievement Inspires Rural Students as Daughter of Labourer Mother and Shepherd Father Becomes Officer

sakal

Updated on: 

सातारा : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे या छोट्याशा गावातून आलेली उज्वला टिंगरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा आव्हानांवर मात करत तिने वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळवला. मेंढपाळ वडील आणि शेतमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईच्या कष्टांना लेकीने आपल्या यशातून जणू सलामच केला आहे. उज्वलाच्या या यशामुळे झरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, तिच्या संघर्षाची कहाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories