राज्य ऍथलेटिक्‍स संघटना अध्यक्षपदी उमेश जाधव : सांगलीचे एस.एल. पाटील सचिव

sports.jpg
sports.jpg
Updated on: 

सांगली-  महाराष्ट्र ऍमॅच्युअर ऍथलेटिक्‍स असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी उमेश जाधव (पुणे) आणि सचिवपदी एस.एल. पाटील (सांगली) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे बदल अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. जाधव, सचिव श्री. पाटील यांनी दिली. 

राज्य ऍमॅच्युअर ऍथलेटिक्‍स असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी पार पडली. 2020 ते 2024 या चार वर्षाच्या कालावधीसाठी ही कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी संतोष नायडू हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. निवडलेली राज्य कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- उमेश जाधव (पुणे), सचिव- एस.एल. पाटील (सांगली), उपाध्यक्ष- उत्तमचंद ठाकूर (अमरावती), सुनिल धांडे (बीड), जीवन मिस्कीन (यवतमाळ), रमेश जाधव (नाशिक). सहसचिव- प्रसाद पाठक (मुंबई), अतुल पाटील (अमरावती), सुभाष गावंडे (वाशिम), खजिनदार- यताळा भगत (सोलापूर).

सदस्य- डॉ. मोईनुद्दीन फारूकी (औरंगाबाद), राजेंद्र साळवे (नाशिक), राजू जॉन (यवतमाळ), संजय मोहड (अकोला), दिलीप चिंचकर (सातारा), हेमंत भदाणे (धुळे), प्रमोद खरात (जालना), सचिन स्वामी (सांगली), रोहित घाग (पुणे), अशोक इंगळे (बुलढाणा), राजाराम दिंडे (औरंगाबाद) 
दरम्यान संस्थेच्या निवडीबद्दल धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे बदल अर्ज दाखल करण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्त यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, अभय छाजेड, मनोहर येणकर, राजू कुलकर्णी आदी उपस्थित होते. 
 

""राज्यातील मैदानी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू. राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या खेळाडूंना देखील विशेष सहकार्य केले जाईल. मैदानी खेळाचा अधिकाधिक प्रसार करून खेळाडूंना न्याय दिला जाईल.'' 
- एस.एल. पाटील (सचिव, राज्य ऍथलेटिक्‍स संघटना) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Protesting remarks on farmers and demanding a public apology.
Thrilling 'Hedam dance' infused in Farande Baba catches attention.
Plan to shut down Gokul by causing Rs 24 crore loss during administrator period
Koyna dam water release increased to 2100 cusecs