Video : फडणवीस, चंद्रकांतदादांसह माझे राज्यात सत्तेसाठी प्रयत्न  ; काय म्हणाले आठवले पाहा व्हिडीओ

Union Social Justice Minister Ramdas Athawale criticized on shivsena sangli political marathi news
Union Social Justice Minister Ramdas Athawale criticized on shivsena sangli political marathi news
Updated on

सांगली  :  राज्यात गेल्या काही काळापासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ठाकरे सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार अपयशी आहे. भाजपचे सरकार यावे, यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा आणि आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलतांना केली.


राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आयोजित आदर्श माता पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते सांगलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. मुंबईत अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी केली गेली. त्याच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. हे गंभीर आहे. राज्यात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. 

आरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. राज्य सेवेच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. येत्या 21 तारखेला घेण्याचा निर्णय झाला आहे, तो आता पुढे ढकलू नये.ते म्हणाले, "कोरोना पुन्हा डोके वर काढतो आहे. देशातील दहा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आहे. त्यापैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. सरकारने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. लोकांनीही खबरदारी आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.''

नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे, त्याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. आठवले म्हणाले, "राज्यातील परिस्थिती बिघडत राहिली तर त्याचा विचार करायला हरकत नाही. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची इच्छा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याकडे ठाकरे सरकारने लक्ष द्यावे.''

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com