
-बलराज पवार
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत झाला आहे. त्याला वर्ष उलटून गेले, तरीही या उपकेंद्राच्या स्थापनेला गती आलेली नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गतवर्षी सांगलीत विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचा निर्णय दोन मिनिटांत घेऊ, असे स्पष्ट केले होते, त्यालाही वर्ष उलटले आहे. आता ते स्वतः सांगलीचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस ते गती देतील, अशी अपेक्षा आहे.