सांगलीचा लॉकडाऊन संपला... असे आहेत नवे नियम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

जिल्ह्यात गेली आठवडाभर सुरु असलेला नागरीभागातील कडक लॉकडाऊन उद्यापासून ( ता. 31) शिथिल करण्यात येणार आहे.

सांगली ः जिल्ह्यात गेली आठवडाभर सुरु असलेला नागरीभागातील कडक लॉकडाऊन उद्यापासून ( ता. 31) शिथिल करण्यात येणार आहे. नागरीभागातील उद्योग, व्यापार, व्यवसाय, बांधकाम सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या अटींसह जिल्हातंर्गत बससेवाही सुरु करण्यात येणार आहे. पाच ऑगस्टपासून क्रीडांगणेही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कडक लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रशासनाने चर्चा केल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात 22 ते 30 जुलै दरम्यानच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी भागातील व्यापार, उद्योग, व्यवसायिकांना यापूर्वीच्या अटींमध्ये परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येतील. रात्री 9 ते पहाटे पाच या काळात संचारबंदी कायम राहणार असून या वेळेत अत्यावश्‍यक सेवा सुरु राहणार आहेत. केशकर्तनालये सुरु राहतील. 1 ऑगस्टपासून दुचाकीवर दोघांना परवानगी असेल. त्यांना मास्क व हेल्मेटची सक्ती असेल. ' 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले," या काळात शाळा, कॉलेज, खासगी क्‍लासेस बंदच राहणार आहेत. चित्रपटगृह, व्यायामशाळा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंदच राहतील. हॉटेल, गेस्टहाऊस बंद, मात्र पार्सल सेवा सुरु राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unlock starts in sangli from 31 st july