शिराळा : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानमधून (Rajasthan) येथे आलेले कुटुंब. जवळ पैसा नसल्याने पोराला सद्गुरू आश्रमशाळेत (Sadhguru Ashram School) घातले. त्याने गुणवत्ता सिद्ध केली. चोविसाव्या वर्षी सहायक जिल्हाधिकारी झाला. ही कहाणी आहे आहे फरशी काम करणाऱ्या गोपाल चौधरी यांच्या बिरजूची.