उत्तमराव करपे यांचे पुण्यात निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

करपे यांनी नगर जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केले. नगर जिल्हा परिषदेत त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले.

नगर : नगर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव गंगाधर करपे (वय 62) यांचे आज सकाळी पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. 

जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी
(कै.) करपे यांच्या मागे पत्नी व दोन विवाहीत मुली असा परिवार आहे. करपे यांनी नगर जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केले. नगर जिल्हा परिषदेत त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. नगर व पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची करपे यांची कारकीर्द विशेष लक्षणीय ठरली.

 साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलची स्थापना
पुण्यात त्यांनी नगर जिल्हा मित्र मंडळाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना जोडीत त्यांच्या पाल्यांसाठी विविध उपक्रम राबविले. जिल्हा परिषदेतील निवृत्तीनंतर करपे यांनी नगरला औरंगाबाद रस्त्यावर साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करुन अल्पावधीत ते नावारुपाला आणले. येथील अमरधाम स्मशानभूमीत (कै.) करपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (कै.) करपे हे नेवासे फाटा येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांचे व्याही, प्रभात डेअरीचे संचालक सारंगधर व किशोर निर्मळ यांचे मेव्हणे तर युनायटेड वेस्टर्न बॅंकेतील माजी अधिकारी व चित्रकार राजेंद्र वहाडणे यांचे साडू होत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttamrao Karpe dies in Pune