esakal | सांगलीत 1 मेपासून 18 वर्षावरील लसीकरण अशक्‍य; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

बोलून बातमी शोधा

vaccine

सांगलीत 1 मेपासून 18 वर्षावरील लसीकरण अशक्‍य; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

sakal_logo
By
जयसिंग कुभांर

सांगली : जिल्ह्यात येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठीची लसीकरण मोहिम सुरु होणार नाही. तथापि 45 वर्षावरील नागरिकांसाठीची मोहिम पुर्ववत सुरुच राहील असे आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'जिल्ह्यात लस तुटवडा आहे. आज मोहिम बंद करावी लागली. तथापि राज्यासाठीचा उपलब्ध लसीचा तुटवडा विचारात घेता 18 वर्षावरील वयोगटासाठीची लसीकरण मोहिम पुढे सुरु करता येणार नाही. राज्यस्तरावरून पुढील आदेश येईपर्यंत ही स्थिती राहील. तथापि या वयोगटासाठी लसीकरणासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात नव्याने 400 नवी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. शासन आदेश येताच पुर्ण क्षमतेने ती कार्यान्वीत होतील.'

हेही वाचा: धक्कादायक! कोरोना उपचारास 4 ते 7 दिवसांचा विलंब ठरतोय मृत्यूचे मुख्य कारण

पुढे ते म्हणाले, 'जिल्ह्यात 45 वर्षावरील लसीकरण आज बंद असले तरी लस उपलब्ध होताच पुर्ववत गतीने ते सुरु होईल. त्यात कोणताही खंड पडणार नाही. या वयोगटासाठीची गरज लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले आहे.'