रूग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ; कोविड सेंटरमध्ये तोडफोड... वाचा कुठे घडली घटना

संजय गणेशकर
Sunday, 6 September 2020

पलूस ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला असताना त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकिय अधीक्षक डॉक्‍टर अधिक पाटील यांना शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

पलूस (जि. सांगली) : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला असताना त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकिय अधीक्षक डॉक्‍टर अधिक पाटील यांना शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सुरक्षा सरक्षक विकास सावंत यास लाथाबुक्‍याने मारहान करुन रुग्णालयातील वैद्यकिय व इतर साहित्याची मोडतोड केली. अशी फिर्यात पलूस ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत वसंत वड्ड ( वय 35) रा. सांडगेवाडी यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली आहे. 

याप्रकरणी एका डॉंक्‍टरसह चौघाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवार ता. 4 रोजी रात्री 11.45 वाजता पलूस ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दुधोंडी येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथेच असलेल्या सौरभ संजय आळसंदकर, विजय शशिकांत आळसंदकर, आमित आजित आळसंदकर, डॉ. आभिजीत अजित आळसंदकर ( सर्व रा. दूधोंडी) यांनी संगनमत करुन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक डॉ. अधिक पाटील यांच्या अंगावर धावून जावून, त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच येथील सुरक्षा रक्षक विकास सावंत यास लाथाबुक्‍याने मारहान केली. तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला सोडत नाही. अशी धमकी देवून इतर रुग्णावर उपचार करण्यास मज्जाव करून शासकीय कामामध्ये अडतथळा आणला.

रुग्णालयातील वैद्यकिय व इतर साहीत्याचे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले. असे डॉ. वड्ड यांनी फिर्यादित म्हटले आहे. चौघा आरोपी विरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. 

दरम्यान, रुग्णाचे नातेवाईकडून डॉक्‍टर व कर्मचारी यांना मारहाण झालेप्रकरणी रुग्णालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये भितिचे वातावरण आहे. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vandalism at Palus Covid Center, confusion of relatives after death of Corona patient