वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू; अधिकाऱ्यांची चिंता वाढली

घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू;  अधिकाऱ्यांची चिंता वाढली
Updated on

सांगली: गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या (Vasantdada Shetkari Sahakari Bank) २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी ॲड. आर. डी. रैनाक यांनी तातडीने दोन सुनावण्या घेऊन महिन्या अखेरीस उलट तपास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे.

वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू;  अधिकाऱ्यांची चिंता वाढली
नाशिकमध्ये मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचं अकाली निधन

वसंतदादा बँकेतील घोटाळाप्रकरणी सहकार विभागाकडील एका अपिलवर सुनावणीवेळी २०१८ मध्ये स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर त्यावर सुनावणी प्रलंबित असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चौकशी थांबली होती. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करताना सहकारमंत्र्यांसमोर हे अपिल फेटाळण्यात आल्याने बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू;  अधिकाऱ्यांची चिंता वाढली
राजापूरच्या रिफायनरी विरोधी संघटनेचं CM ना पत्र; थेट भेटीची मागणी

महिन्याअखेरीस उलट तपासणी होण्याची चिन्हे आहेत. अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संबंधितांच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही त्यांनी काढले होते. अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया आल्यानंतर तत्कालिन सहकारमंत्र्यांनी एका अपिलावर स्थगिती दिली व प्रदीर्घ काळ चौकशी ठप्प होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Marathi News Esakal
www.esakal.com