
अजित कुलकर्णी
तब्बल ९ महिन्यांचा कालखंड...२९ हजार किलोमीटर प्रवास...रोज २०० ते ३०० किलोमीटरची रपेट...ऊन, वारा, वादळ, पाऊस, थंडीचे आव्हान पेलत १६ देशांची भ्रमंती... १६ हजार फूट खडतर पर्वतराजी...दिवसातील १२ ते १६ तास सायकल प्रवास...ही अचाट कामगिरी केलीय सांगली जिल्ह्याच्या कन्येने. मूळ मणेराजुरी (ता. तासगाव) येथील व सध्या स्कॉटलंड येथे असलेल्या वेदांगी कुलकर्णी या २६ वर्षीय तरुणीने केलेली सायकलभ्रमंती दुसऱ्यांदा पूर्ण करणारी ती जगातील पहिली महिला सायकलपटू ठरली. इव्हेंट मॅनेजमेंट पदवीधर व स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये करिअर करणाऱ्या वेदांगीचा हा प्रवास शब्दशः सातासमुद्रापार झाला आहे.