
-बाळासाहेब गणे
अपार कष्ट अन् जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणता येते, हे तुंग (ता, मिरज) येथील वेंदात प्रवीण वाईंगडे याने दाखवून दिले आहे. त्याने भारत सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘एनडीए’ प्रवेश परीक्षेत देशातून १६० व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवीत तुंगचा व सांगली जिल्ह्याचा झेंडा देशात रोवला.