स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगली मिरजेतील भेटी आजही चर्चेल्या जातात

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगली मिरजेतील भेटी आजही चर्चेल्या जातात

सांगली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर(Veer savarkar) वेगवेगळ्या निमित्ताने १९३७ पासून १९४४ पर्यंत सांगली-मिरजेत(sangli, Miraj)पाचवेळा आल्याच्या नोंदी आढळतात. त्यांच्या या भेटीबद्दल इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर (Mansingrao Kumthekar)यांनी दिलेली माहिती. निमित्त (savarkar jayanti) स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीचे. (Veer-savarkar-jayanti-2021-Savarkar-5-spot-miraj-and-sangli-historical-news)

बाबाराव आणि सांगली

सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबारावांचे अखेरच्या काळात सांगलीत एसटी स्टँडजवळील एका इमारतीत वास्तव्य होते. १६ मार्च १९४५ मध्ये ते कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडली असताना पाच ते आठ फेब्रुवारी या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर सांगलीत त्यांना भेटण्यासाठी आले होते. बाबारावांच्या सांगलीतील वास्तव्याच्या या इमारतीतमध्ये पुढे दारुचे दुकान सुरू झाल्याने झालेल्या सावरकरप्रेमींनी दीर्घकाळ आंदोलन केले. दुकान बंद झाले. ही वास्तू पाडून पुढे तेथे सध्याची पारेख मेडिकलची इमारती उभी राहिली. सावरकरप्रेमींनी शासनाच्या मदतीने कृष्णाघाटावर स्मशानभूमीलगत बाबारावांचे स्मारक उभे केले. त्याच्या भूमिपूजनाला बाळासाहेब ठाकरे तर उद्‌घाटनाला अटलबिहारी वाजपेयी आले होते. सध्या ही वास्तू अडगळीत पडली आहे.

सावरकर आणि मिरज

मिरजेतील आप्पा कासार हे सावरकरांचे अनुयायी आणि आजन्म शरीरसंरक्षक म्हणून त्यांच्यासोबत होते. मुंबईत सावरकरांचे निधन होईपर्यंत ते तेथेच होते. १९६६ नंतर ते बऱ्याचदा मिरजेत यायचे. मिरजेतील सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच हस्ते झाले. विष्णुपंत कुर्लेकर, दामोदर मोरेश्‍वर भट, महादेवशास्त्री दिवेकर असे सावरकरांचे अनुयायी मिरजेत स्वातंत्र्यानंतरही सक्रिय होते. १९३७ ला स्थानबद्धतेनंतरच्या सावरकरांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी ते सांगली दौऱ्यावर आले असता त्यांची रेल्वेस्टेशनपासून मिरवणूक काढण्यात आली होती.

सावरकर आणि भाषा शुद्धी

स्वातंत्र्यवीरांच्या १९३७ च्या दौऱ्यात मिरजेतील भानू तालीम आणि अंबाबाई तालीम या दोन संस्थांना सावरकरांनी त्यांनी भेटी दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी तालीम या शब्दाऐवजी व्यायामशाळा असा शब्दप्रयोग सुचवला होता. त्यांच्या या भाषाशुद्धीच्या मोहिमेची प्रेरणा म्हणूनच मिरजेतील विष्णूपंत कुलकर्णी आणि महादेवशास्त्री गोखले यांनी स्थापन केलेल्या हायस्कूलचे नामकरण त्यांनी "प्रशाला' असे केले. तीच आजची विद्यामंदिर प्रशाला. २९ ते ३१ जुलै १९४१ रोजीच्या त्यांच्या सांगली-मिरजेतील चार दिवस मुक्कामात त्यांनी ३० जुलैला सांगलीतील गजानन मिलला भेट दिली होती. मिलचे मालक विष्णूपंत वेलणकर यांचा उल्लेख कर्मचारी ‘मालक’ असा करायचे. सावरकरांनी ‘मालक’ हा परकीय शब्द असून त्याऐवजी धनी हा शब्द वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून वेलणकर ‘धनी’ झाले.

नाट्यसंमेलन आणि सावरकर

५ नोव्हेंबर १९४३ मध्ये सांगलीत मराठी नाट्यशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष होते. तिथून ५ नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिवस म्हणून साजरा होऊ लागला. या नाट्यसंमेलनात त्यांनी मूकपटानंतर आलेल्या बोलपटांमुळे नाट्यकलेला कोणताही धोका नाही उलट तो नाट्यकलेचा विकासच ठरेल असा आशावाद व्यक्त केला होता. तेव्हा नगरपालिकेच्यावतीने त्यांना मानपत्र देण्यात आले. जिल्हा नगरवाचनालयात त्यांनी लोकमान्यांच्या छायाचित्राचे अनावरण केले. ७ नोव्हेंबरला त्यांनी गाडगीळ सराफांकडे चहापान केले. मुरलीधर मंदिरात हिंदुराष्ट्र दलाच्या कार्यकर्त्यांसाठी भाषण केले. कारखानदार आण्णूकाका भिडे यांच्या घरी भेट दिली होती. भावे नाट्यमंदिरासमोरील त्यावेळच्या जयश्री चित्रपटगृहात त्याकाळी "माझं बाळ' चित्रपट पाहिला होता. या चित्रपटाच्या मध्यंतरावेळी त्यांच्या हस्ते दिग्दर्शक विनायक, लेखक वि. स. खांडेकर, अभिनेते दामुअण्णा मालवणकर यांचा सत्कार झाला होता. या चित्रपटाच्या खेळाचे उत्पन्न राष्ट्रकार्यासाठी सावरकरांकडे सोपवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com