esakal | वीर सेवा दलाचे विक्रमी 3065 बाटल्या रक्तसंकलन

बोलून बातमी शोधा

Veer Seva Dal's record 3065 bottles of blood collection}

महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री व आरोग्य राज्यमंत्र्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत वीर सेवा दलकडून 3065 बॉटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

वीर सेवा दलाचे विक्रमी 3065 बाटल्या रक्तसंकलन
sakal_logo
By
बाळासो गणे

तुंग (जि. सांगली) : महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री व आरोग्य राज्यमंत्र्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत वीर सेवा दलकडून 3065 बॉटल्या रक्तसंकलन करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी दिली. या उपक्रमाचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कौतुक केले. 

कोरोनामुळे राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंत्री यड्रावकरांनी वीर सेवा दलाला रक्त संकलन शिबीर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सेवा दलाने 3065 बाटल्या रक्तसंकलन करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासामोर ठेवला आहे. ठिकठिकाणच्या शाखा कार्यक्षेत्रातील 41 गावांतून कार्यकत्यांनी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले. यापूर्वीही कोरोना काळात वीर सेवा दलाकडून 750 बॉटल्स रक्त संकलन झालेले आहे. 

यासाठी अध्यक्षांसह पदाधिकारी भूपाल गिरमल, एन. जे. पाटील, रावसाहेब कुन्नुरे, सुभाष मगदूम यांच्यासह विविध शाखा कार्यकर्ते, तसेच विविध संस्था व तरुण मंडळांनी सहकार्य केले. सिद्धी विनायक कॅन्सर हॉस्पिटलचे अधिकारी व शिबिराचे संयोजक जिनेंद्र पत्की व वैभव चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सहभागी गावे (कंसात रक्‍त बाटल्यांची संख्या) : पार्श्वनाथनगर सांगली(21), कानडवाडी(30), नांद्रे(211), कुंभोज(161), वसगडे (1), ब्रह्मनाळ(31), क.डिग्रज(87), वाळवा(45), उमळवाड(86), टाकळी(82), नांदणी(109), घोसरवाड(41), अकिवाट(51), क.सांगाव(110), शिरटी(59), वळीवडे(57), कवठेसार(39), क.शिरगाव(37), बोलवाड(50), मजले(38), खिद्रापूर(52), जयसिंगपूर(215), बुर्ली(58), कुरुंदवाड(100), अब्दुल लाट(110), भेंडवडे(50), रुकडी(46), आळते(231), इंगळी(26), व्हन्नूर(27), शेडशाळ माळ(41), मिणचे(37), कोरोची(122), तमदलगे(58), हिंगणगांव(58), सांगवडे(43), कोल्हापूर रुईकर कॉलनी(24), कळंबी(64), नरंदे(44), म्हैशाळ(45), हेरले(109), साजणी(65) 

अनेक गरजूंना याचा लाभ होणार

मुख्यमंत्री व आरोग्य विभाग यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देवून वीर सेवा दलाने उच्चांकी रक्तसंकलन केल्याबद्दल राज्य शासनाने विशेष दखल घेतली आहे. वीर सेवा दलाने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्याचे विशेष कौतुक असून, अनेक गरजूंना याचा लाभ होणार आहे. 
- राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री 

संपादन : युवराज यादव