चिमुरड्यांनी भरविला भाजीबाजार 

Vegetables marketed by children
Vegetables marketed by children
Updated on

राशीन  : "मावशी, मेथीची ताजी-ताजी भाजी घ्या... काका, फ्रेश टोमॅटो घ्या.... अहो, कोबी... वांगी स्वस्त लावलीत... मस्त चटकदार खमंग भेळ घ्या... गावरान शेवगा घ्या...' अशा एकापाठोपाठ एक आरोळ्यांनी आठवडे बाजार डोक्‍यावर घेतला गेला होता. मात्र, हे विक्रेते कोणी व्यापारी अथवा शेतकरी नव्हते, तर ती होती करपडी आणि सिद्धटेक परिसरातील चिमुरडी विद्यार्थी मंडळी. 

करपडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व सिद्धटेकच्या शंभूराजे इंग्लिश मीडियमच्या प्रांगणात हा भाजीबाजार चिमुरड्यांनी मांडला होता. या दोन्ही बाजारांमध्ये पालकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बटाटे, कांद्याची पात, कारली, दोडकी, भोपळे, अशा आपल्या शेतातील भाज्या या चिमुरड्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी मांडल्या होत्या. 


या बाजारात ग्राहक मोठे आणि छोट्या विक्रेते यांच्यामध्ये भावावरून घासाघीस सुरू होती. मात्र, ग्राहक जास्त हट्ट न करता विक्रेत्यांनी सांगितलेला भाव खुशीने देत भाजी खरेदी करीत होते.

शालेय ज्ञानासोबत व्यवहारज्ञान विकसित व्हावे, गणिती प्रक्रियांसोबत व्यवहारचतुरता या चिमुरड्यांच्या अंगी यावी, या उद्देशाने या भाजीबाजारांचे आयोजन संबंधित शाळांनी केले होते. करपडी शाळेच्या भाजीबाजारात सुमारे 25 हजारांची उलाढाल झाली, तर शंभूराजे शाळेच्या बाजारालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 


बाजाराचे उद्‌घाटन करपडीचे माजी सरपंच सुनील काळे, रवींद्र काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काळे, अशोक माने, बाबा शेख यांच्या हस्ते, तर सिद्धटेकच्या सरपंच वैशाली मोरे, प्रमोद शेळके, देविदास गोडसे यांच्या हस्ते तेथील शाळेच्या बाजाराचे उद्‌घाटन करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी करपडीचे मुख्याध्यापक हनुमंत शिंदे, राजेंद्र माळवदकर, अनिल मंडलिक, अनिल साळवे, सविता शेलार, शंभूराजे स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता गोलांडे, योगिता शेंडगे, रत्नमाला रसाळ, नितीन लोंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
son dies after mother death in nipani
Marathi News Esakal
www.esakal.com