भाजी विक्रेता आपल्या दारी; कऱ्हाड पालिकेचा उपक्रम

भाजी विक्रेता आपल्या दारी; कऱ्हाड पालिकेचा उपक्रम

कऱ्हाड : शहरातील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी होणारी गर्दी विचार घेवून पालिकेने आज (शुक्रवारी) मंडई बंद केली. त्याऐवजी सातही पेठांमध्ये घरपोच भाजीपाला देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. भाजीपाल्यांची आवक न झाल्याने येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यात आला. पालिका व बाजार समितीच्या सहकार्याने भाजीपाल्याची आवकही आजपासून सुरू झाली.

रात्रीपासून भाजीपाला येथे दाखल होत आहे. भाजीपाल्यांची सुमारे एक हजार पेंड्या तर सकाळी कांद्याच्या एक हजार पिशव्या दाखल झाल्या. त्यामुळे शहरात भाजीपाल्याची वितरण व्यवस्था सुरळीत आहे. शहरातील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होवू नये यासाठी पालिकेने आजपासून मध्यवर्ती मंडई बंद केली.

यापुर्वी भाजी विक्रेत्यांना तेथे बसण्यास मनाई केली. विक्रेत्यांना ठराविक अंतरावर  ठेवून विक्री करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यासाठी पालिकेने आखून दिलेल्या चौकानात विक्रीचे आदेश दिले. मात्र मंडईत नागरीक नेहमीप्रमाणे सकाळी गर्दी करत होते. त्यामुळे मंडई बंदचा निर्णय घेतला. त्यावर उपाया म्हणून पेठ निहाय पालिकेने भाजी घरपोच देण्याची व्यवस्था केल्याचे सांगितल्यानंतर मात्र नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यासाठी सात पेठांमध्ये 14 ठिकाणी 17 लोकांकडून भाजीपाल्या विक्रेत्यांची सोय केली आहे. त्यासाठी प्रत्येक विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक देवून त्यांना ऑर्डर दिल्यास ते भाजीपाला घरपोच करतील. त्याशिवाय प्रत्येक भागात त्यांनी ती भाजी विकण्याच्याही सुचना केल्या आहेत. शहरात तालुक्यासह अन्य भागातून भाजीपाल्याची आवक व्हावी, यासाठी पालिका, पोलिस यांनी बाजार समितीच्या मदतीने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.

Coronavirus : साताऱ्यातील सव्वा वर्षाचा बालकासह युवकाचा रिपाेर्ट निगेटिव्ह 

त्यानुसार आज सकाळपासून बाजार समितीत मालाची आवक सुरू झाली. त्यामुळे  भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्याबाबत बाजार समितीमधील  एकता संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश थोरात यांच्याशी चर्चा केली. श्री. थोरात यांनी ती यादी पालिकेकडे दिली आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला मार्केटमध्ये पूर्ववत कामकाज सुरू झाले. शेतीमालाची आवक सुरू झाल्याने शहरातील भाजीपाल्याचा तुटवडा संपणार आहे. उपाध्यक्ष थोरात यांनीही मुख्याधिकारी डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम यांच्या सहकार्याने भाजीपाला विक्री शहरात नियमित सुरू झाल्याचे सांगितले.

शहरातील काही पेठा मोठ्या आहेत. त्याची विभागणी करून भाजीपाल्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मंगळवार पेठेतील मुळीक पंप ते कन्याप्रशाला, सुशांतनगर परिसर, वाखाण परिसर असे भाग केले आहेत. बुधवार पेठेत शिवाजी हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रूग्णालय व मुळ बुधवार पेठ आणि शनिवार पेठेत आझाद चौक ते दत्त चौक, दत्त चौकापासून कोयनादूध कॉलनी ते कोल्हापूर नाका, कार्वे नाका, मुजावर कॉलनी, सुपर मार्केट अशी विभागणी केली आहे.

(अनुक्रमे परिसर, भाजीपाला विक्रेत्यांचे नाव, वाहन क्रमांक)
(सर्व विक्रेत्यांचे माेबाईल क्रमांक 02164 222237 पालिकेतून मिळू शकतील) 

सोमवार पेठ - रविद्र साने व दिलेरशहा नदाफ - वाहन क्र. - एम. एच. 11 - ए. आर. 374 व एम. एच. 11 - ए.जी. 0070

मंगळवार पेठ - क्रांतीकुमार मोरे, विनोद सुर्यवंशी, दिलीप कांबळे, आशपाक मुल्ला, वाजीद मुल्ला - एम. एच. 50 - 6650 ,     एम. एच. 10 झेड 6743 व एम. एच. 50 - जी. 1018

 बुधवार पेठ - बळीराम काळे, आदम सनदी व दिलीप कांबळे - एम. एच. 50  6650 , एम. एच. 10 झेड 6743 व एम.   एच. 50 - जी. 1018
 गुरूवार पेठ ः शौकत मुल्ला -
 शुक्रवार पेठ - चांदसाब निशानदार - एम. एच. 50 - 7072
 शनिवार पेठ - गणेश काटवटे, शहाजबाज बागवान, इर्शाद बागवान, मुजम्मील नायकवडी, बब्बर सनदी - एम. एच. 50 -   6125

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com