प्रखर हेडलाईटच देतेय अपघातांना निमंत्रण....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वाहनांच्या प्रखर हेडलाईटमुळे कणबर्गी मार्गावर वाहन अपघात होत आहेत. त्यामुळे या दुभाजकामधील मोकळ्या जागेत रोप लागवड करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

कणबर्गी (बेळगाव) - रस्ता चौपदरीकरणानंतर दुभाजकावर झाडे लावलेली नसल्याने वाहनांच्या प्रखर हेडलाईटमुळे कणबर्गी मार्गावर वाहन अपघात होत आहेत. त्यामुळे या दुभाजकामधील मोकळ्या जागेत रोप लागवड करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

दुभाजकांवर रोप लागवडीची मागणी

मोठ्या रस्त्यांवर दुभाजकाच्या मधोमध रोप लागवडीसाठी मोकळी जागा ठेवली जाते. रोप वाढीनंतर समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्याचा त्रास वाहनधारकांना होत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता कमी असते. पण, अपघातप्रवण क्षेत्रात रोप नसल्यास वाहनांच्या प्रखर दिव्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. समोरील वाहन आपल्या अंगावर येत असल्याचा भास होऊन अनेक जणांचा ताबा सुटून अपघात झाले आहेत. यामुळे अनेक जणांना मोठा फटका बसला आहे. सध्या कणबर्गी मार्गावर रस्त्याचे चौपदरीकरण झालेले असले तरी दुभाजकावरील मोकळ्या जागेत रोपांची लागवड व त्यांची वाढ योग्य पद्धतीने करण्यात आली नाही. यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रखर दिव्यांचा त्रास होऊन अपघात घडत आहेत. हा मार्ग चौपदरीकरण झाला असल्याने प्रखर दिव्याची व मोठी वाहने सुसाट असल्याचे दुचाकी व छोटे वाहनधारकांचे मत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी हा मार्ग धोकादायक बनत असल्याने दुभाजतकांवर रोप लागवड करुन योग्य वाढ करण्याची मागणी होत आहे.

वाचा - अरेच्चा... फोटो क्लिक नंतरच मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ...

सौंदर्य खुलले

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अशाप्रकारे दुभाजकाच्या मोकळ्या जागेत झाडे वाढविली आहेत. त्याठिकाणी विविध प्रकारच्या फुलांची रोपे लावली आहेत. त्यामुळे मार्गाचेही सौंदर्य खुलले आहे. यामुळे या मार्गावरही रोप लागवड करुन या मार्गाचेही सौंदर्य वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle accidents are on the way to Kanabergi due to intense headlights marathi news