फाटकावर अती घाई, जीव घेई...

 Vehicle holders are often seen at the train gates
Vehicle holders are often seen at the train gates

अनगोळ (बेळगाव) - चौथ्या रेल्वे फाटकावर नेहमीच वाहनधारकांकडून बेशिस्त दिसून येत आहे. वाहतूक नियमानुसार रस्त्याच्या एका बाजूने वाहने नेणे गरजेचे असतानाही रेल्वे फाटकावरून रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावण्यात येत आहेत. या प्रकारामुळे रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून असाच प्रकार सोमवारी (ता. १७) घडला. त्यामुळे याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

घाईमुळे कोंडीसह अपघाताला निमंत्रण

अनगोळ केएलई इंजिनिअरिंग कॉलेजजवळील चौथ्या रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी रेल्वे फाटक पडल्यानंतर वाहधारकांनी दोन्ही बाजूने आपली वाहने लावली. फाटक खोलल्यानंतर दोन्ही बाजूने वाहने आल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नियमानुसार ज्या ठिकाणी दुतर्फा रोड आहेत, त्या ठिकाणाहून रस्त्याच्या दुतर्फा वाहने पुढे नेणे गरजेचे असते. तर उजव्या बाजूचा मार्ग समोरून येणाऱ्या वाहनांसाठी खुला ठेवावा लागतो. चौथ्या रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग होताना दिसत आहेत.

चौथ्या रेल्वे फाटकाप्रमाणेच शहरात अन्यत्रही वाहनधारकांकडून अशाच प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. शहरात पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, फुलबाग गल्ली, गांधीनगर या ठिकाणी एकूण सहा रेल्वेफाटक आहेत. प्रत्येक रेल्वेफाटकावर असे प्रकार दिसून येतात. रेल्वे ये-जा करताना रेल्वे फाटक पडल्यानंतर येथे वाहतूक पोलिस असणे गरजेचे असते. मात्र, अनेकवेळा वाहतूक पोलिस नसल्याने वाहनधारकांकडूनही उल्लंघन केले जात आहे. यामुळे एखादा अपघात अथवा वाहतूक कोंडीचा प्रसंग घडतो. बरेचशे वाहनधारक इंडिकेटर न लावता वळण घेतात. यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वे फाटक पडल्यानंतर रेल्वे येईपर्यंत वाहनधारक फाटकाच्या खालून वाहने पुढे घेऊन जातात. यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलिस राहिल्यास धोका टळू शकतो, असे मत वाहनचालकांतून व्यक्‍त होत आहे.

रेल्वे फाटक पडल्यानंतर वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. यामुळे रेल्वे पुढे गेल्यानंतर वाहतूक कोंडी होते. अनेक वेळा फाटकावर वाहतूक पोलिस नसल्यामुळे फाटक पडल्यानंतर त्या खालूनही वाहने पुढे नेली जातात. यामुळे धोका वाढला आहे.
-प्रशांत पाटील, वाहनधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com