बंद म्हणजे बंद टोटल बंद, विनाकारण फिराल तर फटकेच, खोटं वाटतंय बघा व्हिडिअो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते.

नगर ः लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आज जनता कर्फ्यूमुळे घरात राहणेच पसंत केले. या जनता कर्फ्यूमुळे अनेकांना मोकळा वेळ मिळाला. या वेळातून त्यांनी जुने अलबम आपल्या कुटुंबियांसमवेत पाहून आपला दिवस घालवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सर्वांनीच प्रतिसाद देत एक दिवस कुटुंबसासाठी असे म्हणून सर्वजण घरीच बसलेले आहेत. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी कायमच बाहेर राहत आहेत. तिच परिस्थिती शासकीय अधिकारी व कर्मचारीा यांच्याबाबतीतही आहे.

या सर्वांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देता येत नव्हता. परंतु या सर्वांनाही आज जनता कर्फ्यूमुळे वेळ मिळाला आहे. यातील अनेकांनी घरातील जुने अलबम काढून कुटुंबियांसमवेत जुन्या आठवणीत रमण्यात आपला दिवस घातला. यामुळे अनेकांच्या घरातील लहानांसह मोठ्यांचे चेहरे खुलले होते. वर्षातून आमच्यासाठी असाच एक दिवस द्या, असे लोकप्रतिनिधी व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमधून बोल निघत होते. तेच बोल काहींनी सोशल मीडियावर स्टेटस ठेऊन जनता कर्फ्यूला धन्यवाद देत आमचे बाबा, आमचे पप्पा, आमचे काका, आमचे मामा आज आमच्या आनंद सहभागी झाल्याचे नमूद केलेले आहे. 

घरी बसून घेतला बाहेरील घटनांचा आढावा 
आपल्या मतदार संघात काय चालले? काय परिस्थिती आहे याची माहिती लोकप्रतिनिधींनी घरी बसून कार्यकर्त्यांकडून घेतली. तसेच अनेकांनी सोशलच्या माध्यमातून मतदारांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. 
 
काहींनी वाचनाला वेळ दिला 
वेळ मिळत नसल्याचे इच्छा असूनही अनेकांना वाचनासाठी वेळ देता आला नाही, अशा काहींनी आज घरात बसून आपली वाचनाची इच्छा पूर्ण केली. 

गृहिणींनी उरकली घरातील कामे 
नोकरीमुळे अनेक दाम्पत्य कायमच घराबाहेर राहत असतात. परंतु आजच्या जनता कर्फ्यूमुळे मुलांसह घरातील सर्वचजण घरात राहिल्यामुळे महिलांनी घरातील साफसफाई त्यांच्या मदतीने उरकून घेतली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video Public Curfew Ahmadnagar Total Closed