जिल्ह्यातून विधान परिषदेवर प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडले गेलेले सदाभाऊ खोत हे सत्ताधारी पक्षातील एकमेव आमदार आहेत.
सांगली : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २७ मार्चला निवडणूक आहे. त्यात एक रिक्त जागा ही आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची आहे. त्या जागेवर भाजप जिल्ह्यातील निष्ठावंताला संधी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दोन दशकांहून अधिक काळ या संधीची वाट पाहणारी भाजपची (BJP) मंडळी ‘बोलावणे येईल का,’ असा विचार करीत आहेत.