Vidhan Sabha 2019 : एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही; चंद्रकातदादांचा खासदार मंडलिकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा प्रा. संजय मंडलिक यांना दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन केले. 

कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा प्रा. संजय मंडलिक यांना दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन केले. 

लोणार वसाहत येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित भाजप - ताराराणी आघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटील यांच्या या वक्तव्याला गर्दीने खचाखच भरलेल्या गणेश मंगल कार्यालयातील कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, दक्षिणचे उमेदवार आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, यांच्यासह प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. 

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ""आमदार महाडिक कामाचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने करतात. मागे लागून आणि मानगुटीवर बसूनच त्यांनी अनेक विकासकामे केली आहे. जिल्ह्यात दक्षिण आणि कागल हे दोनच मतदारसंघ असे आहेत की त्याकडे राज्याचे लक्ष असते. दक्षिण मतदारसंघात पैशाच्या जीवावर असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जाते. विरोधक चाणाक्ष आहे. पाठीत खंजीर खुपसणारा आहे. त्यामुळे सावधपणाने ही निवडणूक लढली पाहिजे.'' 

ते म्हणाले, ""मी कोथरुडमधून लढत असलो तरी जिल्ह्यात माझ्या सभा होणारच. मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवले, असे विरोधी पक्ष वक्तव्य करतात; पण मी तेथे अडकलेलो नाही. तेथे प्रचार करून मी कोल्हापुरातही आलो आहे. कोथरूडमध्ये दोन्ही काँग्रेसनी राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. माझ्याविरोधात दिलेला तगडा उमेदवाराचा दोनवेळा पराभव झाला आहे. यावेळी मी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईन. कोल्हापुरातही तसेच आहे. सतेज पाटील यांनी स्वतः पडू म्हणून पुतण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. पुतण्याचा बळी ते देत आहेत. त्यामुळे ऋतुराज यांना पहिलीच निवडणूक हरावी लागेल.'' 

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, आरपीआयचे उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली. 

मी बी ध्यानात ठेवलंय..पवार विसरले 
सतेज पाटील यांच्या "आमचं ठरलंय' याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत "मी बी ध्यानात ठेवलंय' असे वक्तव्य केले होते. याचा संदर्भ देत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ""मी बी ध्यानात ठेवलंय हे पवार आता सोईस्करपणे विसरलेले दिसतात. धनंजय महाडिक अजूनही तुम्ही पवारांच्या ही बाब लक्षात आणून द्या, असेही म्हणताच सभागृहात हशा पिकला. जिल्ह्यातील सोयीचे राजकारण संपवा आणि विकासाचे,निष्ठेचे आणि प्रेमाचे राजकारण सुरु करा, असे आवाहनही विरोधकांना केले आहे. 

लाथों के भूत... 
आमदार महाडिक हे कधीही कोणावरही राजकीय टीका करत नसल्याचा संदर्भ देत माजी खासदार महाडिक म्हणाले, ""आमचा विरोधक विकासावर बोलतच नाही. तो सतत महाडिक द्वेषातूनच बोलत असतो. त्यामुळे त्यालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. लाथों के भूत बातोंसे नही मानते, अशाच पध्दतीचे वर्तन आमच्या विरोधकाचे आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Chandrakant Patil comment