Vidhan Sabha 2019 : निवडणूकीबाबत डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या....

सुनील कोंडुसकर
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

चंदगड - भाजप की राष्ट्रवादी अशा द्विधा मनस्थितीत असणाऱ्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी आज सकाळी कार्यकर्त्यांसाठी व्हॉट्‌सपवरुन "मनोगत' व्यक्त केले. निरोपाच्या या पत्रात सात वर्षातील कामाबद्दल संघटना म्हणून कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. तसेच जिल्हा नेतृत्वाने सातत्याने खच्चीकरण केल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे. निवडणूक न लढविण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मात्र खच्चीकरण झाले आहे. 

चंदगड मतदारसंघातून डॉ. बाभूळकर यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरवी त्यांचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान हा मतदारसंघ शिवसनेच्या वाट्याला असल्याने निर्णय होत नव्हता. त्यातच शिवसेनेने संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचा मार्ग खुंटला. राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी मंगळवारी (ता. 1) आमदार कुपेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र आज बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांसाठी निवेदन जारी करुन रिंगणातून माघार घेतली.

निवेदनात त्यांनी संघटनेसाठी हा क्षण अत्यंत बिकट असल्याचे नमूद केले आहे. कै. कुपेकर यांच्या तोंडची "आंधळ्याच्या गाई देव राखतो' ही म्हण उध्घृत केली आहे. सात वर्षे संघटनेसाठी शंभर टक्के वाहून घेतले. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवण्याचा प्रयत्न केला. एव्हीएच सारख्या प्रकल्पाला हद्दपार करण्याचे काम केले. या काळात कधीही पदाची अपेक्षा केली नाही. कार्यकर्त्यांशी वेगळे नाते विणले गेले हे सांगताना पुन्हा त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना टोला लगावला आहे. केवळ राजकारण करणाऱ्यांना हे नाते समजणार नाहीच, उमगणारही नाही असे म्हटले आहे. कै. कुपेकर यांनी बांधलेली संघटना जिल्हा नेतृत्वाने सातत्याने विरोधकांना ताकद देऊन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे संघटना वाढत गेली. विकासासाठी लोकांनी गट - तट सोडून संघटनेत सहभाग घेतला. संघटनेच्या प्रमुख पदावरुन बाजूला होताना मनाला वाईट वाटते. परंतु बदल हा निसर्ग नियम आहे. विकासाचा हा वारसा आपणा सर्वांच्या हाती सुरक्षित आहे. या वळणावर प्रेमाने निरोप द्यावा. आपले आशिर्वाद आणि प्रेमाची शिदोरी घेऊन आपण व आई संध्यादेवी कुपेकर हा प्रवास थांबवत असून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती डाॅ. बाभूळकर यांनी केली आहे.

संघटनेच्या कार्यकर्त्यांना यापुढील काळात नेतृत्व स्विकारताना भावनिक अडचण होऊ नये. त्यांना मोकळीक मिळावी म्हणून 5 तारखे पर्यंत आपण संपर्कात नसल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Dr Nandini Babhulkar comment on election