'मी ठरवलंय भाऊंना निवडलयं'; मानसिंगराव नाईक यांचा अर्ज दाखल

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

शिराळा - महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत अलोट गर्दीत भरला. मी ठरवलंय भाऊंना निवडलयं चा नारा सर्वत्र घुमत होता.

शिराळा - महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत अलोट गर्दीत भरला. मी ठरवलंय भाऊंना निवडलयं चा नारा सर्वत्र घुमत होता.

आंबा मातेचे दर्शन घेऊन फेरीस सुरुवात झाली. अंबामाता मंदिरापासून सोमवार पेठ, कुरणे गल्ली, गुरुवारपेठ मार्गे, बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत ही फेरी काढण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राजवर्धन पाटील, भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, सुनीता नाईक, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराज पाटील, लिंबाजी पाटील, रणजित पाटील उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फेरीच्या मार्गावर फुलांची उधळण करून मानसिंगराव नाईक यांचे स्वागत केले.

मी ठरवलंय भाऊंना निवडलयं
मानसिंगराव नाईक यांचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साहात गर्दी केली. प्रत्येकाच्या डोक्यावर असणारी पांढरी टोपी व त्यावर मी ठरवलयं भाऊंना निवडलयं हे घोषवाक्य लिहिल्याने वेगळीच रंगत आली होती. महिलांनीही या टोप्या घातल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Mansingrao Naik fill form from NCP