Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी हा अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष; पाहा कोणी केली टीका?

गुरुदेव स्वामी
Sunday, 13 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तालुक्यातील भोसे येथे बोलताना व्यक्त केला.

भोसे (सोलापूर) : आमदार भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार? असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तालुक्यातील भोसे येथे बोलताना व्यक्त केला.

शिवसेना, भाजप, शिवसेना-भाजपा, रिपाई, महासंग्राम युतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. या वेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समिती सदस्य सदस्य सुरेश ढोणे, नितीन पाटील, दादासाहेब गरंडे, कांतीलाल ताटे, भारत पाटील, जयंतराव साळे, गौडापा बिराजदार, सूर्यकांत ठेंगील, काशिनाथ पाटील, नितीन पाटील, दीपक वाडदेकर, नामदेव जानकर, बापूराव मेटकरी, सुरेश कांबळे, विजय बुरकुल, बंडु जाधव, धनंजय गडदे, दत्तात्रय ताटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले की, मोठ्या मालकाला पांडुरंगाच्या रूपाने उभा केले असून 2009 साली भालकेंनी आपल्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून, घराला चकरा मारल्या उमेदवारी देत प्रचार करून आमदार केल्यावर नऊ दिवसांत आम्हाला सोडले सोडून गेले. जे औदूंबर आण्णा विसरतात. मग, आम्हाला कसं विसरणार नाहीत? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केलेला सदाभाऊ हा देखील मंगळवेढ्याच्या पाण्यासाठीची लढाई लढण्यास तयार आहे परंतु, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. कृष्णा खोऱ्यात अतिरिक्त होणारे पाणी मंगळवेढ्यास देणार आहे.

सहा महिन्यात 45 गावांचा प्रश्न सोडवल्या शिवाय राहणार नाही आणि आता भालके म्हणतात मी या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर दहा वर्षे कुठे गेला होता? असा सवाल करत 45 गावांचा प्रश्न सोडल्याशिवाय मी परत या तालुक्यात सभा घ्यायला येणार नाही, अशी प्रतिज्ञा खासदार महास्वामीजी साक्षी ठेवत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 sadabhau khot statement on ncp in sangli district