Vidhan Sabha 2019 : चंदगडला बाभूळकर गटाकडून 'यांना' उमेदवारी

Vidhan Sabha 2019 : चंदगडला बाभूळकर गटाकडून 'यांना' उमेदवारी

चंदगड - तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. गट टिकवून ठेवायचा असेल तर आपला उमेदवार हवा या मतावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार विलास पाटील (बसर्गे) यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. उद्या (ता. 4) ते अर्ज दाखल करणार आहेत. 

गटाच्या प्रमुख आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेतल्यामुळे मतदारसंघात प्रभावी असलेल्या या गटाच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. संघटन टिकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

जे. बी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य कलाप्पा भोगण, अरुण पिळणकर, बाबूराव हळदणकर, गणेश फाटक, विनोद पाटील, विष्णू गावडे, बबनराव देसाई यांनी भुमिका मांडली. कै. कुपेकर यांच्यावरील निष्ठेने कार्यकर्ते एकत्र आले. त्यांच्या निधनानंतर ते आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. बाभूळकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र हे संघटन टिकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी खंबीरपणे एकत्र राहण्याचे ठरले. त्यानुसार विलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरुन त्यांच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. 

अमर चव्हाणांचा राष्ट्रवादीतून अर्ज...
गडहिंग्लजचे माजी सभापती अमर चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी चंदगडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पाटणे फाटा येथे बैठक सुरु होती. बैठक आटोपून विलास पाटील व सहकारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आले होते. मात्र वेळ संपल्यामुळे त्यांना अर्ज मिळाला नाही. ते उद्या अर्ज घेऊन भरणार आहेत. मात्र यामुळे चंदगड आणि गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विभागल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com