Vidhan Sabha 2019 : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत डॉ. विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कडेगाव - माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विराट जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातून श्री. कदम निवडणुक रिंगणात उतरले आहेत. 

यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहर व परिसर दणाणून गेला.
डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व प्रथम वांगी येथे सोनहीरा साखर कारखाना परिसरातील डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. तसेच चिंचणी येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. 

त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसह काढण्यात आलेल्या रॅलीने कडेगाव येथे त्यांचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर कडेगाव येथे सुरेशबाबा चौकात जंगी सभा सुरु झाली. त्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी निवडणूक कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांचेकडे दाखल केला.

यावेळी त्यांच्या सोबत आमदार मोहनराव कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शांताराम कदम, भाऊसाहेब यादव, दीपक भोसले आदी उपस्थित होते. सभास्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, कुणाल चौधरी, राष्ट्रवादीचे राजवर्धन पाटील यांचेसह जिल्ह्यातील व पलूस - कडेगाव तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Vishwajeet Kadam Fill form