Vidhansabha2019 : ऋतुराज पाटील उतरणार 'कोल्हापूर दक्षिण’मधून रिंगणात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ घटू नये म्हणून विधान परिषद आमदारांना विधानसभेची उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ घटू नये म्हणून विधान परिषद आमदारांना विधानसभेची उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सतेज पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी (ता. ५) कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे.

सकाळी अकराला हा मेळावा ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क येथे होईल. त्यात या संदर्भातील निर्णयाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात कोल्हापुरात होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील संख्याबळ कायम ठेवण्यासाठी विधानपरिषद आमदाराला विधानसभेची उमेदवारी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. आमदार पाटील यांची विधानपरिषदेची मुदत अजून तीन वर्षे आहे, तत्पूर्वी विधानसभा लढवणे संयुक्तिक वाटत नाही, असा एक सूर त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहे. 

आमदार पाटील यांचे पुतणे ऋतुराज संजय पाटील यांना कोल्हापूर उत्तरमधून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू होती. तशी मुलाखतही ऋतुराज यांनी दिली होती. ‘उत्तर’ हा पाटील यांच्यादृष्टीने सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. त्याचवेळी आमदार पाटील हे स्वतः दक्षिणमधून लढण्याच्या तयारीत होते. एकाच घरातील दोन उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातून  उभे राहिल्यास अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे  आपण स्वतः थांबून पुतणे ऋतुराज यांना आमदार पाटील यांच्याकडून दक्षिणमधून रिंगणात उतरले जाण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Ruturaj Patil candidate from Kolhapur Dakshin