चंद्रकांत पाटील यांनी केली सोलापुरात "ही' भविष्यवाणी 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पवार भिजल्याने भाजपचा पराभव नाही 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची भिती दाखवली किंवा ते पावसात भिजल्याने भाजपचे उमेदवार पडले नाहीत. आपण एकोप्याने वागलो नाहीत त्यामुळे आपला पराभव झाला. पक्षाच्या जवळ असलेल्यांपेक्षा जवळच्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह झाला. त्याचाही फटका बसला. 
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

सोलापूर ः ""काही दिवसांपूर्वीचे पालकमंत्री, काही दिवस माजी मंत्री आणि काही दिवसानंतर पुन्हा पालकमंत्री होणारे विजय देशमुख, अशी सुरवात करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात राज्यातील आगामी स्थितीसंदर्भात भविष्यवाणीच केली. 

हेही वाचा... राज्यातील सहा महापालिकांमध्ये पोटनिवडणुका 

सोलापूरच्या नूतन महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे यांच्यासह आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचा.. दिव्यांगांसाठीचे पहिले न्यायालय पुण्यात 

शहर भाजपमधील सुंदोपसुंदीवर नाराजी 
श्री. पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये शहर भाजपमध्ये सुरु असलेल्या सुंदोपसुंदीबाबत नाराजी व्यक्त केली. चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा दिली की संघटनात्मक पातळीवर चांगले काम होते, असे ते म्हणाले. गेली तीन वर्षे महापालिका चालवत असताना मतदारांच्या विश्‍वासाला तडा जाण्याचे प्रकार होत आहेत. मतभेद असायला हवे, जसे आज परळीमध्ये पंकजाताईंनी सांगितले. त्यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध तर सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. आपले मतभेद असले तरी त्यावर चार भिंतीच्यामध्ये झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. 

हेही पहा... माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू ः पंकजा 

... तर दुसऱ्यावर अन्याय होणारच 
कुणाला तरी न्याय म्हणजे कुणावरती अन्याय होणारच. न्याय सर्वांना मिळत नाही. तिकीटे सर्वांनाच मिळणार नाहीत. तसे करायचे झाल्यास घटनेत बदल करावा लागेल. महापालिका प्रभाग, विधानसभा, लोकसभेच्या मतदारसंघात इच्छुक असलेल्या सर्वांना एबी फॉर्म द्यावा आणि ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो भाजपचा उमेदवार असे करावे लागेल. तशी आपली ईच्छा असेल तर मी उद्या तसा मेल पंतप्रधान मोदींना करतो. मात्र हे शक्‍य नसते. सर्वांनी घटना स्वीकारली आहे, त्यानुसारच धोरण असले पाहिजे, असेही श्री. पाटील म्हणाले. संघटनमंत्री सतीशजी यांनी सांगितल्याप्रमाणे 

हे आवर्जून पहा...  काय म्हणाले चंद्रकांत पाटील (VIDEO)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay deshmukh again gaurdian minister after some time says chandrakant patil