विलासराव देशमुखांचा रात्री अडीचला फोन आला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी आज जनसेवा पुरस्कार सोहळ्यात काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. सन 2007 साली दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबई वेठीला धरली होती. मुंबईचे दूध रोखले होते. त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अमेरिकेत होते. तेथून त्यांनी रात्री अडीच वाजता फोन केला होता, अशी आठवण श्री. शेट्टी यांनी सांगितली.

ते म्हणाले, ""सरकारचे नाक दाबल्याशिवास तोंड उघडत नाही. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. राजकीय नेत्यांनी मुंबई फार प्यारी असते. त्यामुळे दूध दराचा प्रश्‍न आल्यावर मी मुंबईचे दूध तोडायचे ठरवले. चार दिवस मुंबईत दूध येऊ दिले नाही. मुंबईतील लोकांइतकेच राजकीय नेतेही अस्वस्थ झाले. विलासराव देशमुख त्यावेळी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी तेथून रात्री अडीचला मला फोन केला. आंदोलन मागे घ्या, दोन दिवसांत आर. आर. पाटील तुमच्यासोबत बैठक घेतील आणि दूध दरवाढ होईल, अशी ग्वाही दिली.''
ते म्हणाले, ""पण इतक्‍या सहजासहजी शेतकऱ्यांना काही मिळत नाही. त्यावेळीही तसेच झाले. विधानसभेत आवाज उठवावा लागला. दोन दिवस विधानसभा बंद पाडली. मग कुठे दोन रुपयांची दरवाढ मिळाली.''

राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या संदर्भातीलही एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ""सन 2009 साली लोकसभेत ऊस दराबाबतच्या विधेयक चर्चेला होते. त्यावेळी कृषीमंत्री शरद पवार यांनी ऊसाचा प्रतिटन उत्पादन खर्च 620 रुपये असल्याचे सांगितले. मी त्यांना रोखले. मी एकटाच, तरीही त्यावर आक्षेप नोंदवत 40 मिनिटांचे भाषण केले. मी शरद पवार यांना म्हणालो, 620 रुपये खर्चात कुठे ऊस पिकतो, तेवढा पत्ता सांगा, मी शेतकऱ्यांना तेथे नेतो आणि असा ऊस पिकावायचा असतो, असे सांगतो.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilasrao deshmukh calls late night 2.30 a.m.